पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे सरकार आहे- अजित पवार

मुंबई |  पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन केलं. मात्र त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत अजित पवार यांनी आक्षेप नोंदवत सरकारवर टीका केली आहे.

जनतेच्या भावनांची, समस्यांची या सरकारला जाण नाही. दाराशी आलेल्या मराठा तरुणांना पोलिसांकरवी हुसकावलं. विद्यार्थी रडतायेत, आत्महत्येची मागणी करताहेत तरी या सरकारला पाझर फुटत नाही, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

2014 च्या जीआरनुसार पात्र सर्वांना नोकरी मिळालीच पाहिजे. RTO परीक्षेला राखीव प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, त्यात दुमत नाही. पण खुल्या वर्गातल्या 135 विद्यार्थ्यांना वगळलं, हा अन्याय आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, तरूणांचं म्हणण कमीत कमी चंद्रकांत पाटील यांनी ऐकून तरी घ्यायला हवं होतं, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-