ओला उबेरमुळे वाहन क्षेत्रावर मंदी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं तर्कट

नवी दिल्ली |  हल्लीच्या काळात कर्ज काढून गाडी घेण्यापेक्षा अनेकजण मेट्रो किंवा ओला-उबर कॅबमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाहन क्षेत्रावर अरिष्ट कोससळं आहे, असं तर्कट अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लावलं आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

वाहन क्षेत्रातील घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बीएस-6 चे निकषापासून वाहन नोंदणी शुल्क आणि लोकांची मानसिकता या घटकांचा समावेश आहे. मात्र वाहन क्षेत्रात होणारी आर्थिक घसरण गंभीर समस्या असल्याचंही सीतारमन यांनी मान्य केलं आहे.

आम्ही सर्वच क्षेत्रातील समस्यांबाबत गंभीर आहोत. या समस्यांचे निराकरण होण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलणार असून हे सरकार सर्वांचेच ऐकत आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.

आवश्यकता भासल्यास आणखी काही घोषणा केल्या जातील, असंही निर्मला सीतारमन यांनी म्हटलं.

दरम्यान, ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे.

महत्वाच्या बातम्या-