छत्रपतींनी घालून दिलेला आदर्श सदैव प्रेरणा देत राहिल- अजित पवार

मुंबई | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. छत्रपतींनी घालून दिलेला आदर्श सदैव प्रेरणा देत राहिल, असं ते म्हणाले.

राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, असं ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. आम्हालाही राज्य चालवताना त्यांचा आदर्श सदैव प्रेरणा देतो, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या-

-“लॉकडाऊनबाबत नियोजन नव्हतं, त्याचेच परिणाम आज देश भोगत आहे”

-…म्हणून देशाने राहुल गांधी यांचे आभार मानायलाच हवेत; शिवसेनेचं ‘रोखठोक’ मत

-‘या’ बड्या नेत्याने ट्विटरवरून भाजप हटवले, पक्षामध्ये एकच खळबळ

-शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्र्यांचं शिवाजीराजांना वंदन

-पुणे महापौरांच्या पाठीवर चंद्रकांतदादांची कौतुकाची थाप तर अजित पवारांना मात्र झिरो मार्क