अजित पवार हे नाव नसतं तर शिखर बँकेचं प्रकरण समोर सुद्धा आलं नसतं- अजित पवार

मुंबई | शिखर बँकेच्या सत्तर संचालकांमध्ये जर अजित पवार हे एक नाव नसतं तर प्रकरण समोर सुद्धा आलं नसतं. केसच उभी राहिली नसती, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहिली चौकशी संपत नाही तोवर दुसरी सुरु, असं म्हणत अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आम्हीही माणसं आहोत. आम्हालाही भावना आहेत, असं म्हणताना ते अतिशय भावनिक झाले.

शरद पवारांचा काहीही संबंध नाही, ना ते बँकेचे ना सभासद, ना त्यांची कुठे सही, तरीही त्यांचं नाव गोवलं गेलं याचं मला दु:ख वाटतंय, असंही त्यांनी सांगितलं.

आमच्या घरामध्ये कोणताही गृहकलह नाही. शरद पवार आमच्या कुटुंबाचे कुटूंबप्रमूख आहेत. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

माझ्या सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. माझ्या समर्थकांना आणि पक्षातल्या लोकांना यामुळे त्रास दिला. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-