अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना ५०-५५ वेळा फोन केले???

पुणे : विधानसभा निवडणूकीसाठी इंदापूरची जागा तुमच्यासाठी सोडू अशी कोणती चर्चा हर्षवर्धन पाटलांसोबत कधीच झाली नाही. भाजपमध्ये जायचं हे त्यांचं आधीच ठरलं होतं. आता त्याची पावती हर्षवर्धन पाटील आमच्या नावाने फाडत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार चांगलेच भडकले आहेत.  

विधानसभा निवडणूकीच्या जागेबाबत वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य करु असं ठरलं होतं. इंदापूरला मेळावा घेत त्यांनी आमच्यावर टीका करत नाहक बदनाम केलं. त्यानंतर त्यांना कित्येकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत, असं सांगत हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतराच्या कारणाला अजित पवारांनी विरोध केला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी वरिष्ठ पातळीवर सुरु होती. इंदापूरामध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्या जागेबाबत आम्ही हर्षवर्धन पाटलांना कोणताही शब्द दिला नव्हता, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. 

हर्षवर्धन पाटील आणि माझा राजकीय वाद आहे. मात्र आम्ही त्यांचा शब्द पाळला नाही हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. आम्हाला बदनाम करण्याचे काम करु नये, अन्यथा ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे. 

स्थायी समितीवर हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता यांची वर्णी लावावी अशी स्पष्ट सूचना मी जिल्हा परिषद अध्यक्षांना दिल्या होत्या. राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी त्यांना मतदान करण्यास सांगितले मात्र यातही नाहक शंका घेण्याचा प्रयत्न पाटलांकडून झाला असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-