मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवारांची ग्वाही

मुंबई |  मराठवाड्यातला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक आहे. मराठवाड्यात वॉटर ग्रीड व नद्याजोड प्रकल्प राबवण्यासाठी जलसंपदा, पाणीपुरवठा विभाग तसंच सेवानिवृत्त तज्ज्ञ अधिकारी आणि आमदार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल. तसेच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मराठवाड्यात ज्या भागात पाऊस पडत नाही, त्या भागातली धरणं भरत नाहीत. त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचं पाणी कमी पाण्याच्या भागाला देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. जायकवाडीचे पाणी पैठणला देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. या योजनेचे वेगवेगळे टप्पे करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

मराठवाड्यातील वॉटर ग्रीडची कामे पूर्ण करण्याबाबाबतच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रश्नावरील उत्तरात अजित पवार यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबाबत शासनाची भूमिका विधानसभेत स्पष्ट केली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड योजना न राबवण्याचे संकेत गेल्या काही दिवसांत मिळाले होते. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीमुळे यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रामदेव बाबा कोरोनापासून वाचण्यासाठीचा देशी उपाय सांगताना म्हणतात…

-हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देणारा रितेश देशमुखचा टिक टाॅक व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

-पंतप्रधानांचा परदेश दौऱ्यावरील खर्च कोटींच्या घरात; आकडा वाचून व्हाल थक्क

-इस्राईलच्या पंतप्रधानांनी कोरोनापासून वाचण्यासाठी ‘ही’ भारतीय पद्धत वापरण्याचा दिला सल्ला

-मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होंगे; जयंत पाटलांचा मुनगंटीवारांना टोला