केजरीवाल घाबरले?; घेतला होळी न खेळण्याचा निर्णय

दिल्ली| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाचे सर्व आमदार यावर्षी होळी खेळताना दिसणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी होळी न खेळण्यामागचे कारण स्पष्ट केले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील होळीच्या उत्सवात सामील होणार नसल्याचे म्हटले आहे.

उत्तर-पूर्व दिल्लीत झालेला हिंसाचाराच्या कारणामुळे केजरीवाल आणि त्यांचे आमदार यावर्षी होळी खेळणार नाहीत. नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात दिल्लीत धार्मिक हिंसा उसळली होती. या हिंसेत 40 हून अधिक लोक मरण पावले. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसेनंतर दिल्ली सरकारने पीडितांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर कोरोना व्हायरसचा असलेला धोका आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर होळी मिलन कार्यक्रमात सहभाग घेणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, घाबरण्याची गरज नाही. आपल्याला मिळून काम करण्याची गरज आहे. स्वत: सुरक्षेसाठी एक छोटं मात्र महत्वपूर्ण पाऊल उचला, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवारांची ग्वाही

-रामदेव बाबा कोरोनापासून वाचण्यासाठीचा देशी उपाय सांगताना म्हणतात…

-हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देणारा रितेश देशमुखचा टिक टाॅक व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

-पंतप्रधानांचा परदेश दौऱ्यावरील खर्च कोटींच्या घरात; आकडा वाचून व्हाल थक्क

-इस्राईलच्या पंतप्रधानांनी कोरोनापासून वाचण्यासाठी ‘ही’ भारतीय पद्धत वापरण्याचा दिला सल्ला