मुंबई | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. मधल्या काळात देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, पुन्हा देशात कोरोनानं डोकं वर काढलं आहे.
महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण पुन्हा एकदा खूप झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रांत काही भागात प्रशासनानं कडक नि.र्बंध लावले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता धो.का पाहता लवकरंच संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवसेंदिवस पुण्यात वाढत जाणारी कोरोना रुग्नांची संख्या लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जावी, अशी मागणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोदी सरकारकडे करणार आहेत. जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालकडे याबाबत प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती देखील अजित पवार यांनी केली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यासह ईतर राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्नसंख्या जास्त आहे. तिथे धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे. यासाठी 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा.
दरम्यान, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. देशभरात 16 जानेवारीपासून सुरु झालेलं कोरोना लसीकरण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोहोचलं आहे. देशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे.
देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जात आहे. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
सचिन वांझेंचा अंतरिम जामीन को.र्टाने फेटाळला, आता वांझे ग.जाआड जाणार?
‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये…..’ सचीन वाझेंच्या स्टेटसनं ख.ळबळ
‘डोकी फु.टली तर रडत दिल्लीत जाऊ नका….’ संजय राऊत
‘राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त…’; नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल
आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर