सचिन वांझेंचा अंतरिम जामीन को.र्टाने फेटाळला, आता वांझे ग.जाआड जाणार?

ठाणे | मनसुख हिरेन प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी एपीआय सचिन वांझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सचिन वांझे यांनीच आपल्या पतीची ह.त्त्या केली असल्याचा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. हे प्रकरण सध्या ठाणे सत्र न्यायालयात आहे.

मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वांझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, ठाणे सत्र न्यायालयाने वांझे यांचा अंतरिम जा.मीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. याप्रकरणी 19 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. मात्र कोर्टाने वांझेंचा अंतरिम जा.मीन फेटाळल्याने सध्या तरी त्यांच्या डोक्यावर अ.टकेची टांगती तलवार आहे.

राष्ट्रीय त.पास यंत्रणा म्हणजेच एनआए सध्या याप्रकरणी त.पास करत आहे. एनआएकडून मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वांझे यांचा जबाब नोंदवला जात आहे. तसेच याप्रकरणी एटीएसच्या तपासला देखील गती मिळाल्याची चिन्हे दिसत आहेत.

एटीएसने हिरेन यांच्या कुटुंबियांचा काल जबाब नोंदवून घेतला आहे. ही चौकशी काल तब्बल 9 तास चालू होती. तसेच काल एटीएसने हिरेन यांचा मृ.तदेह मुंब्रा रेतीबंदरहून ठाण्यात आणणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाचीही काल चौकशी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फो.टकांनी भरलेली गाडी मिळाली होती. सध्या एनआयएकडून या जिलेटीन गाडीचा देखील त.पास केला जात आहे. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. यानंतर काही दिवसांनी हिरेन यांचा संशयास्पद मृ.त्यू झाला.

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृ.तदेह सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये या प्रकरणावरून आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली दिसत आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये…..’ सचीन वाझेंच्या स्टेटसनं ख.ळबळ

‘डोकी फु.टली तर रडत दिल्लीत जाऊ नका….’ संजय राऊत

‘राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त…’; नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल

आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचे दर

छे.डछाड करणाऱ्या रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात मा.रलं, पाहा व्हिडिओ