‘तुमच्या मनात येईल ते…’, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांनी सुनावले खडे बोल

मुंबई | सध्या विधानसभेचे पावासाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात शिंदे गट आणि विरोधी पक्ष यांच्यात मोठ्या शाब्दिक लढाया पहायला मिळत आहेत. प्रश्नोत्तरांच्या तासाला तर तू तू मे मे होत आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरत आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गोविंदासाठी घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) भावनेच्याभरात कोणताही निर्णय घ्यायचा नसतो. त्यांनी थोडा विचार करायला हवा. आले मनात आणि घेतला निर्णय असे होत नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला.

काल (दि. 19) राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदापथकातील तरुणांसाठी सरकारी नोकरीत खेळाडू कोट्यातून पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

त्यांच्या या घोषणेवरुन आता नवीन वादाल तोंड फुटले आहे. या घोषणेला स्पर्धा परीक्षा देणारे (MPSC and UPSC Aspirants) विद्यार्थी आणि पाच टक्के आरक्षणाचे हक्कदार असलेल्या इतर खेळाडूंनी विरोध केला आहे.

अजित पवार अमरावती जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील मेळघाट (Melghat) आणि धारणी (Dharani) या आदिवासी पाड्यांत ते सध्या पाहणी करत आहेत. यावेळी त्यांना राज्य सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले.

गोविंदा पथकांना आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण उद्या जर कोणता गोविंदापथकातील तरुण अशिक्षित असेल, तर त्याला कोणती नोकरी देणार आहात, असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.

गोविंदापथकाव्यतिरिक्त अन्य मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यांना तुम्ही काय देणार आहात, तसेच शासन पोलीस, आरोग्य विभाग आणि शिक्षकांची भरती का करत नाही, असे देखील पवारांनी विचारले.

गोविंदाना देण्यात आलेल्या विम्यावर पवारांनी सरकारची पाठराखण केली. पण आरक्षणावर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी हा निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेतले नाही, किंवा कोणतीही चर्चा केली नाही, असे पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

‘हल्ला केला त्याच ठिकाणी सभा घेणार, दम असेल तर…’ सामंताचा हल्लेखोरांना इशारा

‘केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळल्याने स्वामींकडून भाजपला घरचा आहेर’

फडणवीसांसाठी ब्राम्हण महासंघाची भाजपकडे मोठी मागणी

बिल्कीस बानो प्रकरणावर ओवैसी संतापले; म्हणाले, ‘नशीब नथुराम गोडसेला तरी…’

कोकणातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता