मुंबई | शहरावर 26/11 (Terrorist Attack in Mumbai) नावाने प्रसिद्ध असलेला 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला भ्याड हल्ला कोणीही मुंबईकर आणि भारतवासी विसरणार नाहीत. अशाच प्रकरचा हल्ला परत होणार असल्याचा धमकीवजा इशारा मिळाला आहे.
मुंबईवर हल्ला करण्याचे बरेच संदेश पोलीस (Mumbai Police) आणि तपास यंत्रनेकडे आले आहेत. परंतु चौकशी केल्यावर हे सर्व खोटे आणि माथेफिरुंचे काम असल्याचे निष्पन्न झाले.
शनिवारी सकाळी देखील अशाच प्रकारचा एक संदेश मुंबई पोलीसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या (Traffic Police) अधिकृत व्हॉट्सअप क्रमांकावर प्राप्त झाला. दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन (Shriwardhan) समुद्र किनारी एक बोट सापडली. त्यामुळे ही धोक्याची घंटा असल्याचे सध्या वाटत आहे.
प्राप्त संदेश आणि दोन दिवसांपूर्वी सापडलेली निनावी बोट यावरुन पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सखोल तपासाला सुरुवात केली आहे. राज्य सरकार देखील याची नोंद घेऊन दखल घेत आहे.
मुंबई वाहतूक नियंत्रणाच्या अधिकृत क्रमांकावर हा संदेश प्राप्त झाला असून, हा क्रमांक पाकिस्तानचा (Pakistan) आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण सहा लोक हल्ला करणार असल्याचे संदेशात म्हंटले आहे.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या धमकीची गंभीर दखल घेण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहेच, परंतु केंद्रीय यंत्रणांनी देखील यात लक्ष घालावे, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
महत्वाच्या बातम्या –
‘तुमच्या मनात येईल ते…’, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांनी सुनावले खडे बोल
‘हल्ला केला त्याच ठिकाणी सभा घेणार, दम असेल तर…’ सामंताचा हल्लेखोरांना इशारा
‘केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळल्याने स्वामींकडून भाजपला घरचा आहेर’
फडणवीसांसाठी ब्राम्हण महासंघाची भाजपकडे मोठी मागणी
बिल्कीस बानो प्रकरणावर ओवैसी संतापले; म्हणाले, ‘नशीब नथुराम गोडसेला तरी…’