‘सगळ्यात नशिबवान कोण तर ते देवेंद्र फडणवीस कारण…’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

मुंबई | शिंदे सरकार स्थापन होऊनही भाजप आणि शिंदे गटासमोर बहुमत चाचणीचं आव्हान होतं. बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला.

भाजप व शिंदे गटाला बहुमत चाचणीत 164 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीला मात्र 99 मतं पडल्याचं पाहायला मिळालं.

विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अभिनंदनपर भाषण करताना तुफान टोलेबाजी केली आहे. अजित पवारांनी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून भाषण करताना पाहिलं आहे. मात्र, आज देवेंद्रजींच्या भाषणात जोष नव्हता, असा चिमटा अजित पवारांनी काढला आहे.

सगळ्यात नशिबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण अडीच वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देखील झाले, असा टोला अजित पवारांनी लगावला.

अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील आमदारांना फैलावर घेतलं. शिंदे गटातील आमदारांच्या सुरत, गुवाहाटी व गोवा या प्रवासावरून देखील अजित पवारांनी टीका केली.

दरम्यान, एकनाथ शिंदे सच्चे शिवसैनिक आहेत हे सतत का सांगावं लागतं? याचं आत्मपरिक्षण झालं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

“माझी टिंगल केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो”

मोठी बातमी! शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

शिवसेनेला झटका! शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

‘बुद्धीला विचारून एकदा सांगा की खरंच समाधान झालं आहे का?’; अजित पवारांनी भाजप नेत्यांना डिवचलं

मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड