सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर, ‘या’ व्यक्तीला जामीन मंजूर

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली. सुशांतच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला अनेकदा वेगवेगळे वळण लागल्याचं पाहायला मिळालं.

सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा प्रश्न उपस्थित होत असताना या प्रकरणात ड्रग्जचा संबंध असल्याचं समोर आलं. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्ष उलटले असताना आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी याने सर्वात आधी सुशांतचा मृतदेह पाहिला होता. सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीसह पिठाणीला देखील अटक झाली होती.

ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचा दावा करत सिद्धार्थ पिठाणीने जामीन अर्ज केला होता. या प्रकरणात त्याचा कोणत्याही प्रकारचा सहभाग होता याचे पुरावे आढळले नाहीत, असंही पिठाणीने त्याच्या जामीन अर्जात नमूद केलं होतं.

सिद्धार्थच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून त्याला 50 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने सिद्धर्थ पिठाणीला हैद्राबाद येथून अटक केली होती. अखेर याप्रकरणी सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सगळ्यात नशिबवान कोण तर ते देवेंद्र फडणवीस कारण…’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“माझी टिंगल केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो”

मोठी बातमी! शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

शिवसेनेला झटका! शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

द्धीला विचारून एकदा सांगा की खरंच समाधान झालं आहे का?’; अजित पवारांनी भाजप नेत्यांना डिवचलं