अजित पवार म्हणाले,”शरद पवारांना दिल्लीत जावं लागलं अन्…”

मुंबई | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चाेबांधणी करायला सुरूवात केली आहे. अशामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे.

गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पण राजकारण मात्र राज्यात तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे.

महाविकास आघाडीचा भाग असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रादेशिक पक्ष देखील उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवणार आहेत.

गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपनं गोव्यात पक्षप्रभारी नियुक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस निवडणुकीत सामिल असल्यानं सहाजिकच राजकारण तापणार होतं. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

शरद पवार यांच्यावर फडणवीस यांनी टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शरद पवार यांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून त्यांच्याबद्दल काय बोलावं हे आता नेत्यांना कळायला पाहीजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी त्यांच्यावर केंद्रीय राजकारणात जाण्याची ईच्छा आहे का असा नेहमी प्रश्न येतो यावर आपलं मत मांडलं आहे. मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेलो होतो पण 6 महिन्यात राज्यात परत आलो.

शरद पवार यांना दिल्लीला जावं लागलं म्हणून मी महाराष्ट्रात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून गेलो नाही. मी महाराष्ट्रात आनंदी आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी फडणवीसांवर टीका करतानाच राज्यातील राजकारणावर देखील भाष्य केलं आहे. देशाच्या राजकारणावर आपण देखील बोलू शकतो, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड

कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार