नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) आणि ओमिक्राॅनमुळे (Omicron) देशातील तज्ज्ञांचं टेन्शन वाढलं आहे. अशातच आता कोरोना कधी संपणार असा सवाल आता सर्वांना पडला आहे. त्यावर आता तज्ज्ञांनी आता आनंदाची बातमी दिली आहे.
या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये कोरोना महामारी संपेल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच वेळी, कोरोना लसीचा नवीन बूस्टर डोस किंवा लसीच्या कॉकटेलची आवश्यकता नाही, असं एम्स लसीकरण चाचणी प्रभारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी म्हटलं आहे.
तिसर्या लाटेनंतर भारतातील कोरोना महामारीपासून स्थानिक पातळीवर बदलेल आणि जगातही ही महामारी हळूहळू संपुष्टात येईल. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू राहू शकतो, परंतु मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असेल.
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली, ज्यामागे डेल्टा म्युटेशन हे महत्त्वाचं कारण होतं. त्यावेळी, देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये नैसर्गिक संसर्गाचे प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक झालं होतं, असंही ते म्हणाले.
ओमिक्रॉनच्या उच्च संसर्ग दरामुळे बहुतेक लोकसंख्येला संक्रमित करेल. ज्यानंतर संपूर्ण देशात नैसर्गिक संसर्ग होईल आणि सर्व संशोधनात असं आढळून आले आहे की, लसीपेक्षा नैसर्गिक संसर्ग अधिक संरक्षित असल्याची माहिती देखील त्य़ांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही आता हे मान्य केलं आहे की, बूस्टर डोस पुन्हा पुन्हा दिल्यानं फायदा नाही, तो घातक देखील ठरू शकतो; त्यामुळे आता बूस्टर डोस लसीकरणाची गरज नसल्याचं डाॅ. राय यांनी सांगितलं आहे.
जर आपण DNA किंवा mRNA वरून लस बनवली तर दर 3 महिन्यांनी नवीन लस बनवावी लागेल, जी शक्य नाही. त्यामुळे सध्याच्या आधारावर भविष्यात लसीकरण करता येणार नाही, अशी महत्त्वाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, कोरोनावर एखादं प्रभावी औषध तयार करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड
कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा
“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया
महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार