कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई| डॉक्टरांनी रु.ग्णावर ब.लात्काराचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद शहर पदमपुरा येथील कोरोना उ.पचार केंद्रावर घडली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या सं.तप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मा.रहा.ण केली. औरंगाबाद शहरातल्या रु.ग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा वि.नयभं.ग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करून लागू करण्यात येईल. ही ‘एसओपी’ राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बं.धनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

औरंगाबाद शहरातल्या रु.ग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा वि.नयभं.ग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी याबद्दल माहिती दिली. “औरंगाबादच्या रु.ग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली वि.नयभं.गाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर ब.लात्कार झालेला नाही. मात्र, वि.नयभं.गाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृ.त्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गां.भीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे,” असं पवार म्हणाले.

वि.नयभं.गाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गो.पनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाची चौ.कशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. संबंधित डॉक्टर महिलेचा फोन नंबर घेऊन रोज तिला फोन करून त्रा.स द्यायचा असाही आ.रोप या महिलेने केला आहे. डॉक्टरनं बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिनमध्ये बोलावलं आणि या श.रीरसुखाची मागणी केली.

त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान महिलेने ब.दनामीपोटी पो.लिसात त.क्रार दिली नाही. मात्र महापालिका आयुक्तांना सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

…..म्हणून ‘या’ महिलेनं शेअर केला टाॅयलेट मधला फोटो

निवडणुकीपूर्वी राज्यात खळबळ; ‘या’ नेत्यानं राजकारणाला ठोकला रामराम

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; ‘या’ कारणामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गु.न्हा दाखल

‘इतक्या’ रुपयांनी महागलं सोनं, पाहा काय आहे आजचा भाव…

“ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार”