” रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी लॉकडाऊननंतर मजुर आणि कामगारांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील परप्रांतीय कामगार आणि मजूरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखत त्यांची मागणी फेटाळून लावली होती. सध्या तरी ही गोष्ट अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज अजित पवारांनी थेट रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

3 मे या दिवशी लॉकडाऊन संपल्यानंतर परप्रांतीय कामगार आणि मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू शकतात. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण त्यांच्यासाठी अगोदरच ट्रेनची व्यवस्था करायला हवी. अजित पवार यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पना केंद्र सरकारला तसंच रेल्वे मंत्रालयाला दिली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून बिहार, उत्तर प्रदेश तसंच इतर राज्यांतले कामगार आणि मजूर महाराष्ट्रात अडकून पडलेले आहेत जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत. ते टाळेबंदी संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून रेल्वेमंत्रालयाने मुंबई व पुणे येथून या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

-गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

-महाराष्ट्र असाच चालवला तर लोक चपलेने आभार मानतील, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

-“बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही???”

-गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर