‘पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच…’; UPAच्या अध्यक्ष पदासाठी शरद पवारांचं नाव येताच अजित पवारांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. UPAच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. कॉंग्रेस पक्षाच्या सध्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी या लवकरंच रिटायरमेंट घेण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्यानंतर येत्या काळात शरद पवार यांच्याकडे UPAचं अध्यक्षपद जाईल, असं बोललं जात आहे.

UPAच्या अध्यक्ष पदासाठी शरद पवारांचं नाव येताच राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. अजित पवार यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना देशातील अनेक नेत्यांशी पवारांचे संबंध आले आहेत. ते सत्तेत असतानाही आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध आहेत. विकास कामांमध्ये कोणतंही राजकारण न आणता प्रश्न सुटावेत, असा शरद पवारांचा नेहमीच आग्रह राहिला आहे.

सध्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन जास्त चिघळू नये म्हणून साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. मात्र, त्यांना कॉंग्रेसने काय सांगितलं, हे अजून तरी माझ्या कानावर आलेलं नाही. पवार साहेब दिल्लीत गेले की अशा चर्चा होतंच राहतात, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच येत्या 12 तारखेला आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. तो शांततेत साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे त्यानिम्मित आम्ही शिबिरं घेत आहोत, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी अजून बराच अवकाश आहे. मात्र, कॉंग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरु केली असल्याचं दिसत आहे. 2019च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना UPA सरकारचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून दाखवण्यात आलं होतं.

मात्र, या निवडणुकीत UPAला चांगलाच पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी स्वतः माघार घेत कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. मात्र, आता सोनिया गांधी लवकरच रिटायरमेंट घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या निवृत्तीनंतर शरद पवार UPAचे पुढील अध्यक्ष होणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्र सरकारची जबरदस्त योजना! देशात सर्वत्र उपलब्ध होणार ‘फ्री वाय फाय’

सर्वात मोठी बातमी! सोनिया गांधी रिटायरमेंट घेत कॉंग्रेसचं अध्यक्षपद पवारांकडे सोपविणार?

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने चांदीचे भाव पुन्हा गडाडले

धक्कादायक! फडणवीस सरकार मधील ‘या’ माजी मंत्र्याचं नि.धन

भारतीय बाजारात ‘या’ नव्या SUVची जोरदार क्रेझ; अवघ्या 5 दिवसात 5 हजार बुकिंग!