केंद्र सरकारची जबरदस्त योजना! देशात सर्वत्र उपलब्ध होणार ‘फ्री वाय फाय’

नवी दिल्ली |  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची खूप महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत मोदी सरकारने संपूर्ण देशासाठी एका जबरदस्त योजनेची घोषणा केली आहे. आता भारतात सर्वत्र फ्रि वाय फाय सुविधा मिळणार आहे.

‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अँक्सेस इंटरफेस योजना’ असं मोदी सरकारने नव्यानं आणलेल्या या योजनेचं नाव आहे. या योजने अंतर्गत देशात तब्बल 1 कोटी डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. यामुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय फायची सुविधा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे. या योजनेबद्दल सांगताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अँक्सेस इंटरफेस योजने अंतर्गत देशात 1 कोटी डेटा सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. तसेच या योजनेंतर्गत सरकार सार्वजनिक डेटा कार्यालय (पीडीओ) उघडणार आहे.

यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता लागणार नाही. कोणत्याही सध्याच्या दुकानाला एका डेटा कार्यालयामध्ये रुपांतरीत केले जाईल. सरकारकडून डेटा कार्यालय, डेटा अ‍ॅग्रीगेटर आणि अ‍ॅप सिस्टमसाठी सात दिवसांत केंद्रे उघडण्याची परवानगी दिली जाईल, असंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.

तसेच रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, लक्षद्वीप बेटांवर देखील फायबर कनेक्टीव्हिटी जोडली जाईल. कोच्चिपासून लक्षद्वीपच्या 11 बेटांवर 1000 दिवसांत कनेक्टिव्हिटी दिली जाईल. यामुळे बेटांवर देखील फ्रि वाय फायची सुविधा उपलब्ध होईल.

केंद्र सरकारने नव्याने आणलेली प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अँक्सेस इंटरफेस ही योजना सर्वांसाठी लाभदायी आणि महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेली ही योजना किती प्रमाणत यशस्वी होतेय? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वात मोठी बातमी! सोनिया गांधी रिटायरमेंट घेत कॉंग्रेसचं अध्यक्षपद पवारांकडे सोपविणार?

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने चांदीचे भाव पुन्हा गडाडले

धक्कादायक! फडणवीस सरकार मधील ‘या’ माजी मंत्र्याचं नि.धन

भारतीय बाजारात ‘या’ नव्या SUVची जोरदार क्रेझ; अवघ्या 5 दिवसात 5 हजार बुकिंग!

ॲानस्क्रीन ‘हर्षद मेहता’ची करामत!; 58 दिवसांत कमी केलं 10KG वजन; पाहा व्हिडीओ