‘एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत ऐकलं नाही तर…’; अजित पवारांचा इशारा

पुणे | 31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्रं त्यांना वेगळी संधी मिळणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.

अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं, असं अजित पवारांनी म्हटलंय.

जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं, असं अजित पवार म्हणाले.

आम्ही व्यवस्थित अर्थसंकल्प सादर केलाय. हा असा म्हणाला आणि तुम्हाला काय म्हणायचंय यावर उत्तर देणं हाच धंदा मला नाही, असंही अजित पवार म्हणाले.

अधिवेशनाच्या आधी खूप काही बोललं गेलं की असं होईल, तसं होईल. पण मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे तोपर्यंत हे सरकार चालणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही संपूर्ण पोलीस दलाला सुविधा देत आहोत. तर पोलीसांनी देखील त्यांच काम चोख करायला हवं, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘RRR’ चिटपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडले मागचे सगळे Records

…तर मला विजय चौकात फाशी द्या- सुप्रिया सुळे 

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट