इंदुरीकरांच्या गावाने दाखवली ताकद; महाराजांच्या समर्थनार्थ ‘अकोले’ बंद!

अहमदनगर | ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख यानी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी महाराजांवर टीका केली तर अनेकजण त्यांच्या समर्थनासाठी समोर आले आहेत. इंदोरीकरांच्या समर्थनासाठी आज अकोले तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मोठा प्रतिसाद लाभला.

सभा, भजन व दिंडीच्या माध्यमातून लोकांनी इंदोरीकरांना पाठिंबा दिला. तसेचअकोल्यात येऊन इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू म्हणणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या निषेधार्थ मोर्चा देखील निघाला होता.

अकोले शहरातील बाजारपेठा, दुकानं सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. तसंच ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांचा निषेध करत लोक रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान, सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकरांनी केलं होतं. या वक्तव्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-अवधूत वाघांची जीभ घसरली, नवाब मलिकांना म्हणाले अफजलखानाचे वंशज!

-“भाजपला अनुकूल भूमिका घेतली नसती तर वंचितचे अनेक मंत्री आज मंत्रिमंडळात असते”

-मुख्यमंत्र्यांनी बनवली स्वत:च्या हातांनी स्वत:ची कॉफी… आव्हाडांनी शेअर केला व्हीडिओ

-कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

-एल्गारच्या NIA तपासावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य