उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही- भाजप

मुंबई |  विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रूपये तर फळबागांसाठी 50 हजार रूपये मदत दिली जाईल. त्यामुळे त्यांनी आता दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं दरेकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचं काय झालं?, शेतकऱ्यांना दिलेला शब्द ते पाळणार आहेत की नाहीत? असे सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केले.

सरकारने सरसकट कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी झालीच नाही यावर उद्धव ठाकरे यांनी बोललं पाहिजे, असं दरेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकरांच्या गावाने दाखवली ताकद; महाराजांच्या समर्थनार्थ ‘अकोले’ बंद!

-अवधूत वाघांची जीभ घसरली, नवाब मलिकांना म्हणाले अफजलखानाचे वंशज!

-“भाजपला अनुकूल भूमिका घेतली नसती तर वंचितचे अनेक मंत्री आज मंत्रिमंडळात असते”

-मुख्यमंत्र्यांनी बनवली स्वत:च्या हातांनी स्वत:ची कॉफी… आव्हाडांनी शेअर केला व्हीडिओ

-कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा