अक्षय बोऱ्हाडे गुन्हेगारी टोळ्यांशी परिचीत आहे- तृप्ती देसाई

पुणे | मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे नामक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील अक्षय बोऱ्हाडे हा तरूण गुन्हेगारी टोळीशी परिचित असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

सर्व सामान्यांनी हे सत्य स्वीकारायलाच हवं अक्षय बोऱ्हाडे कोणाचे आभार मानतो आहे. हे बघा जरा आणि हे सर्व कोण आहेत माहित नसेल तर यूट्यूबला चेक करा. हा मुलगा गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे, हे ऐकलं होतं. पण त्याच्या कालच्या लाईव्ह वरून आता सिद्ध झालं, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

अक्षय बोर्ङाडे लाईव्हमध्ये म्हणत होता का? की माझं हे काम बंद झालं तर मी नामचीन गुंड होईन. तो मनोरुग्णांची सेवा करतो म्हणून त्याचे आमच्याकडून अभिनंदनच पण या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे नाव सोडलं तर इतरांची माहिती युट्युब आणि गुगलवर मिळेलच, असं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जुन्नर पोलिसांनी त्याचे सहा महिन्यातील कॉल रेकॉर्डिंग तपासावे, तसेच त्याला मारहाण करण्यात आली अशा स्वरूपाचा व्हिडिओ, लाइव्ह आला त्यानंतरचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग तपासावेत. म्हणजे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजू शकेल, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

-केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

-पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…

-वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत

-‘…हे पत्र एकदा नक्की वाचाच’; प्रियंका गांधींची नरेंद्र मोदींना विनंती