देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रात, पत्रात म्हणतात…

मुंबई |  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. कोरोना रुग्णांना घरी सोडणाऱ्यांचा एकाच दिवशी वाढलेला आकडा आणि वाढत जाणारी मृत्यूंची संख्या याबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.

कोरोनाग्रस्तांना घरी सोडताना त्यांच्या प्रकृतीबाबत योग्य ती खबरदारी न घेता, त्यांना घरी सोडलं जात असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. वांद्र्याच्या पोलीस स्टेशनमधल्या हवालदारांना 10 दिवसानंतर सोडून देण्यात आलं. घरी सोडल्यानंतर अवघ्या काही क्षणात त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी त्यांना 2 तास संघर्ष करावा लागला, पण रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं फडणवीसांनी पत्रात नमूद केलं आहे.

एकीकडे राज्य सरकार रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, असं सांगत आहे. मात्र गेल्या 4 दिवसांत 100 लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत, याकडेही फडणवीसांनी पत्राच्या माध्यमातून लक्ष वेधलं आहे.

कोरोनाविरोधातील लढाई आकडेवारीची नाही, तर रोगाविरूद्ध नाही. त्यामुळे रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत, असं भासवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अक्षय बोऱ्हाडे गुन्हेगारी टोळ्यांशी परिचीत आहे- तृप्ती देसाई

-“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

-केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

-पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…

-वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत