भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला नायब तहसीलदार, बापाचे आनंदाश्रू थांबेना…!

अमरावती |   घरी अठराविश्व दारिद्र्य… पण दारिद्र्याने लढायची प्रेरणा दिली.. अन् मग सुरू झाला अधिकारी बनण्याचा प्रवास… या प्रवासात अनेक खाचखळगे लागले… पण कोणत्याही परिस्थितीत न थांबता प्रवास पूर्ण करायचा असा चंग बांधून परिस्थितीला हरवायचं आणि तिच्या छाताडावर बसून आकाशाला गवसणी घालायची ही जिद्द होती एका भंगार गोळा करणाऱ्या लेकाची म्हणजे अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे राहणाऱ्या अक्षय गडलिंगची…! ही संघर्षकथा जगासमोर आणलीये ई-टीव्ही भारतने…

मागच्या वर्षी झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला. या परीक्षेत अक्षयची नायब तहसिलदारपदी निवड झाली आहे. त्याच्या निवडीने अक्षयच्या आई-बापाच्या डोळ्यांतले आनंदाश्रू थांबता थांबत नव्हते… अक्षयने मिळवलेल्या यशाने त्याच्या वडिलांना आभाळ ठेंगणं झालं आहे.

अक्षयची आई चौथी शिकलीये तर वडिल नववी. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याचे वडिल गावोगावी जाऊन भंगार तसंच रद्दी जमा करतात. तर आई मोलमजुरी करते. अशा परिस्थितीत महागडे क्लासवगैरे लावणं त्याला परवडणारं नव्हतं. म्हणून मग क्साल न लावता अभ्यास सुरू ठेवला. या प्रवासात माझे आईवडील, मित्र तसंच शिक्षकांची मला खूप मदत झाली, असं अक्षयने सांगितलं.

गेल्या वेळी तहसिलदार पदाने चार गुणांनी अक्षयला हुलकावणी दिली होती. मात्र अक्षयने खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. तिवसा इथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांची या प्रवासात खूप मदत झाल्याचं अक्षनये सांगितलं. माझी सेवा मी गोरगरिबांच्या कामाला वापरीन, असाही निर्धार अक्षयने बोलून दाखवला.

महत्वाच्या बातम्या-

-बाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट

-नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत- राहुल गांधी

-बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री; छाप्यात ‘इतक्या’ लाखांचा माल जप्त

-चिंताजनक! पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 823 रुग्ण

-देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे; 24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण