‘त्या’ एका फोनकॉलमुळे अक्षयने ब्लॉकबस्टर सिनेमा हातचा गमावला!

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक खूप मोठं नाव आहे. अक्षयने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अक्षयने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहे.

‘सौगंध’ या चित्रपटातून अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अक्षयचा हा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू चालवू शकला नव्हता. परंतु सौगंध चित्रपटापूर्वी अक्षयला एक ब्लॉकबस्टर चित्रपट ऑफर झाला होता.

दिनेश पटेल यांचा ‘फूल और काटे’ हा चित्रपट अगोदर अक्षय कुमारला ऑफर करण्यात आला होता. परंतु अक्षयच्या नशिबात हा चित्रपट नव्हता. एका फोनकॉलमुळे हा चित्रपट अक्षयने हातचा गमावला.

अक्षय कुमार हे सध्या चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव असलं तरी देखील हे नाव होण्यामागे अक्षयची कठोर मेहनत होती. अक्षयने सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. चित्रपटासाठी त्याने कित्येक निर्मात्यांच्या पायऱ्या झिजावल्या आहेत.

एखादा चित्रपट मिळावा म्हणून प्रतिक्षेत असणाऱ्या अक्षयला ‘फूल और काटे’ हा चित्रपट अक्षयला मिळाला होता. परंतु ऐनवेळी अक्षयला चित्रपटातून रिप्लेस करण्यात आलं. अक्षयने स्वत: याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता.

यावेळी अक्षय म्हणाला होता की, फूल और काटे हा सिनेमा सुरुवातीला मला मिळाला होता. सिनेमाचं शुटींग चालू केलं होतं. या सिनेमाच्या साँग मेकींग, फोटोशुटला मी हजर होतो.

एकदिवस माझं नदीम श्रवनसोबत म्युझिक सेशन सुरु होतं. याचवेळी मला एक कॉल आला आणि उद्या सकाळी शुटींगसाठी येऊ नकोस असं मला सांगण्यात आलं, असा खुलासा अक्षय कुमारने यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ पाच बड्या अभिनेत्री होत्या अक्षयच्या गर्लफ्रेंड, एकीसोबत तर दोनवेळा केला होता साखरपुडा

‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल

…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ