राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई |  10 ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.उदाय परवा ताही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याे वर्तवली आहे.

10 जानेवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वातावरण राहील. वादळासह गारा पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळं मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयएमडीनं गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेडला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबादमध्येही पावसाची शक्यता आहे.

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना लागू असेल. तर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर तालुक्यात आज पहाटे हलक्या पावसाने हजेरी लावलीय, या हलक्या पावसामुळे जिल्हाभरात काहीसा गारठा वाढलाय. या पावसाने शेतात असलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसणार आहे, तसेच आंबा आणि इतर फळबागांना देखील या पावसाने नुकसान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ 5 राज्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर दिसणार नाही नरेंद्र मोदींचा फोटो! 

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा 

हिंदूचं घर जळालं तर मुस्लिमाचं घर थोडीच सुरक्षित राहील- योगी आदित्यनाथ 

Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा अन् आणि मिळवा तजेलदार त्वचा! 

“आम्हाला कुणी विचारत नाही, घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय”