‘या’ 5 राज्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर दिसणार नाही नरेंद्र मोदींचा फोटो!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र काढून टाकलं जाणार आहे. या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचे छायाचित्र हटवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.

निवडणुकांच्या तारखा घोषित होताच तत्काळ आचारसंहिताही लागू झाली आहे. आचार संहितेचा भंग होऊ नये यासाठी आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकांची आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.

राज्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत जो कार्यक्रम राबवला जात आहे, त्यात मोदींचा झळकलेला फोटा यापुढे दिसणार नाही. मोदींच्या फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रातही यामुळे निवडणुका असलेल्या आणि आचार संहिता लागू झालेल्या राज्यांमध्ये दिसणार नाही.

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उत्तर प्रदेशात सात टप्प्यात पंजाब, उत्तराखंड, गोवा मध्ये एका तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत.

दरम्यान, कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा 

हिंदूचं घर जळालं तर मुस्लिमाचं घर थोडीच सुरक्षित राहील- योगी आदित्यनाथ 

Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा अन् आणि मिळवा तजेलदार त्वचा! 

“आम्हाला कुणी विचारत नाही, घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय” 

“सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेलाय, राज्यात सगळा सत्यानाश सुरुय”