15 जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मुंबई | हवामान खात्याकडून 15 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून नागरिकांनाही हवामानाच अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात पावसाची तीव्रता अधिक असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सून दाखल होत असतानाच केरळ उत्तर कोकण किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे.

12 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला असून रायगड सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांमधील काही भागात 13 जूनला पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर 14 जुलैला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला असून उकाड्याने हैराण नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कराडमध्ये शेट्टी-महाडिकांची गळाभेट ; महाडिक राजू शेट्टींच्या रस्त्यातच पाया पडले 

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?; पराभवानंतर शिवसेना ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

“असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो” 

‘मी वाचवू शकलो नाही’ म्हणत त्याने लेकीचा जळालेला पाय पोलिसांकडे नेला; काळीज पिळवटून टाकणारी घटना