गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई!

पुणे | गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) प्रकरणातील शूटर संतोष जाधव याचा शोध घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या एका पथकानं त्याला गुजरातमधून आज अटक केली.

गेल्या सोमवारी मुसेवाला हत्याकांड प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केलं होतं. चार दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला संगमनेर जवळून अटक केली होती.

मंचर येथील राण्या बाणखेले खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण पोलीस संतोष च्या मागावर होते, त्यासाठी त्याचा गुजरात, राजस्थान मध्ये शोध घेतला जात होता. तो बिष्णोई टोळीत सहभागी झाल्याची पोलिसांना माहिती होती.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

15 जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

कराडमध्ये शेट्टी-महाडिकांची गळाभेट ; महाडिक राजू शेट्टींच्या रस्त्यातच पाया पडले 

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?; पराभवानंतर शिवसेना ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

“असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो” 

‘मी वाचवू शकलो नाही’ म्हणत त्याने लेकीचा जळालेला पाय पोलिसांकडे नेला; काळीज पिळवटून टाकणारी घटना