मराठमोळ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल; पत्नीनं केले मारहाण आणि हिंसाचाराचे आरोप

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळत असतो. तो नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा अनिकेत चर्चेचा विषय ठरत आहे.

अनिकेत विश्वासराव याच्या पत्नीनं त्याच्यावर तक्रार दाखल केली आहे. विश्वासरावसह सासू, सासरे यांच्यावर पत्नी स्नेहाने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार केली आहे.

अनिकेतची पत्नी स्नेहा चव्हाण हिनं पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी 498अ, 323, 504, 506 कलमाखाली अनिकेत याच्यासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेतनं 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल या भीतीपोटी तिच्यावर वारंवार हिंसाचार आणि मारणार केली असल्याचं स्नेहानं म्हटलं आहे.

स्नेहानं केलेल्या तक्रारीत हातानं मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केला आहे. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला असल्याचं म्हटलंय.

स्नेहानं केलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2018 मध्ये अनिकेत आणि स्नेहानं लग्नगाठ बांधली होती. मात्र गेल्या काही कालावधीपासून स्नेहा आणि अनिकेतमध्ये मतभेद निर्माण झाले होते. वारंवार त्यांच्यामध्ये वाद होत होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

  थंडीतही पुढील 2-3 दिवस कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  ‘सत्तेची भूक असणाऱ्यांनी….’; कंगनाचा पुन्हा एकदा गांधीजींवर निशाणा

  ‘खासगी जागेत दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही’, ‘या’ उच्च न्यायालयाचा निर्णय

  “शिवसेनेच्या खासदाराला काही कामं उरली नाही, सगळीकडे दलाली करत फिरतो”

  ‘कभी कभी मुझे लगता है की…’; भर कार्यक्रमात संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात वाकयुद्ध