थंडीतही पुढील 2-3 दिवस कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आली आहे. थंडीची लाट आली असली तरी अजूनही पाऊस काही थांबायचं नाव घेईना. यंदा महाराष्ट्र गारठला असताना पाऊसानंही हजेरी लावली आहे. त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढल्याचं चित्र आहे.

ऐन थंडीतही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ऐन थंडीतही पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आहे.

अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज, हवामान खात्यानं वर्तवला आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

थंडी सुरू झाली असे वाटत असतानाच दक्षिणेकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. तिथे जोरदार पाऊस झाला. पाठोपाठ अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा परिणाम आता राज्यावर दिसून येत आहे.

उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वार्‍यांमुळे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सर्वसाधारणपणे 1 ते 3 अंश सेल्सिअसने घसरले होते. अगदी दिवसादेखील थंडी जाणवत होती.

पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील दोन तीन दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देत पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसामुळे थंडीचाही जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल रात्रीही पावसानं पुण्यात चांगली हजेरी लावली. विजांच्या कडकडासह पाऊस कोसळत होता.  रात्रीच्या पावसाचा ओलावा अजूनही असून मंद गार वारे आणी सुसह्य गारवा जाणवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘सत्तेची भूक असणाऱ्यांनी….’; कंगनाचा पुन्हा एकदा गांधीजींवर निशाणा

  ‘खासगी जागेत दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही’, ‘या’ उच्च न्यायालयाचा निर्णय

  “शिवसेनेच्या खासदाराला काही कामं उरली नाही, सगळीकडे दलाली करत फिरतो”

  ‘कभी कभी मुझे लगता है की…’; भर कार्यक्रमात संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात वाकयुद्ध

“हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणूक घ्या”