राज्यातील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाउन लागू

मुंबई | ठाण्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर कोरोनाचे रूग्ण आढळून आले. रूग्ण वाढत असल्याचा धोका लक्षात घेत ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या भागात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

कोरोनाचे रूग्ण वाढत असून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ज्या भागात कोरानाचे हॉटस्पॉट आहे त्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यावरील कोरोनाचं संकट हे दूर झालेलं नाही. कोरोनाविरोधात आपल्याला लढा द्यायचाय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलंय. पण ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात लॉकडाउन लागू करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. मात्र हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहेत. आपण अनलॉकची सुरूवात केली आहे पण धोका अजूनही कायम आहे. गाफील राहू नका. तुम्ही जर घराबाहेर पडला तर कोरोनाचा धोका हा कायम आहे. काळजी घेतली नाही तर संकट वाढणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनावरील ‘ही’ औषधं मोफत देण्याचा सरकारचा विचार- उद्धव ठाकरे

-प्रसारभारतीकडून ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला इशारा; मुलाखत ठरली वादाचं कारण

-“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा

-ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींनी केलं तोंडभरून कौतुक