“NRC लागू होण्याच्या भीतीने 32 जणांचा जीव गेला”

कोलकाता | राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे (एनआरसी) आसाम राज्यात 100 जणांचा मृत्यू झाला, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या नाडिया येथे बोलत होत्या. तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू होण्याच्या भीतीने पश्चिम बंगालमध्ये 31 ते 32 जणांचा जीव गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन देशभरात अशांततेचं वातावरण आहे. एनआरसी आसाम राज्यात लागू करण्यात आला आहे. यात 19 लाख लोकांचा एनआरसीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

ममता बॅनर्जी यांनी सीएए आणि एनआरसीवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय बॅनर्जी यांनी एनआरसीविरोधातही भूमिका घेतली आहे.

दरम्यान, सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…अन् राज ठाकरेंनी दिलं संजय मिस्त्रींना मनसेत येण्याचं निमंत्रण!

-उद्धवजी, शिवजयंती साजरी करताना तिथी सोडा आणि तारीख धरा; राष्ट्रवादीचं आवाहन

-भाजप खासदाराच्या चोराच्या उलट्या बोंबा; आता म्हणतात मी तसं म्हणलोच नाही…!

-‘त्या’ राक्षसालाही पेट्रोल टाकून जिवंत जाळा; पीडितेच्या आईची मागणी

-केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआरसीबाबत केला मोठा खुलासा!