चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले!

मुंबई |  कोरोना महामारीच्या तडाख्याने महासत्ताधीश अमेरिका हतबल झाली आहे. अमेरिकेतील 10 लाख लोकांहून अधिक जणांना आतापर्यंत  कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे तर 50 हजारहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून आलेल्या कोरोनाने अमेरिकेला सर्वांत मोठा झटका दिला आहे. त्यामुळेत आता चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले आहेत.

चीनने कब्जा केलेल्या दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे आरमार घुसले आहे. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने हा दावा केला आहे. चीनने आपला मालकीहक्क असल्याचा दावा केलेल्या दक्षिण चीन सागरात अमेरिकेचे नौदल उतरले. यासह ऑस्ट्रेलियाचे आरमारही या बाजूला सरकत आहे. याच दरम्यान, चीनने लढाऊ विमान पाठवून अमेरिकेच्या नौदलाला मागे ढकलल्याचा दावा चिनी सैन्याने केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चीनवर टीकेचे बाण सोडत आहेत. आता तर परिणाम भोगाचला तयार रहा, अशी धमकीच त्यांनी चीनला दिली आहे. तसंच गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना माझ्या पराभवासाठी चीन काहीही करू शकतं, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, चीन आणि अमेरिका यांच्यात असाच तणाव राहिल्यास जग विनाशक युद्धात ढकलले जाईल, अशी चिंता काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. तर जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग गडद होत असल्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

-कोरोनातून बरे झालेल्या नर्सचं ढोल ताशा लावून स्वागत; पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल

-पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

-आज आमची प्रतिज्ञा कोरोनाविरुद्ध लढण्याची, जिंकण्याची आणि महाराष्ट्र धर्म राखण्याची- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

-महाराष्ट्राच्या योगदानाचा भारताला अभिमान; महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं मराठमोळं ट्विट!