औरंगाबाद महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

विधानसभेला अमित देशमुखांना ‘या’ दोन नेत्यांचे कडवे आव्हान

लातूर : शिवसेना आणि भाजप लातूर विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेण्यासाठी रस्सीखेच करत आहेत. तर दुसरीकडे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ असलेलं लातूर यावेळी नेमकं कुणाला विजयी करणार याकडे लक्ष लागलंय.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या परंपरागत व्होट बँकेवर लक्ष ठेवून मुस्लीम उमेदवार दिला आहे. वंचितचे उमेदवार राजासाब मणियार हे राष्ट्रवादीचे लातूर महापालिकेत एकमेव नगरसेवक होते. आता ते काँग्रेस विरोधात विधानसभा लढवणार आहेत.

लातूर शहर विधानसभा क्षेत्रात मुस्लीम, एससी, एसटी, लिंगायत समाजाचं मोठं मतदान आहे. काँग्रेसचा विजय हा आजपर्यंतच्या निवडणुकीत इथे दलित-मुस्लीम मतांवर अवलंबून राहिला. यावेळी वंचित आघाडीने दिलेला मुस्लीम उमेदवार हा इतर मुस्लीम उमेद्वारांपेक्षा वेगळा आहे. त्यांची प्रतिमा दलित-मुस्लीम आणि इतर लोकांमध्येही आहे.

कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा गड राखण्याची जबाबदारी अमित देशमुखांवर आहे. या दोघांना बाजूला सारून आपला झेंडा लातूरवर फडकावयाची तयारी वंचितने केली आहे. 

जिल्हा परिषदही भाजपच्याच ताब्यात आहे. लातूर जिल्ह्यातल्या सहापैकी तीन विधानसभांवर काँग्रेसचे आमदार, तर तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळची लढत अटीतटीचीच होणार असल्याचं चित्र आहे. 

महत्वाच्या बातम्या-