“मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकरच उतरवतील”

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहित लेटर बॉम्ब टाकला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत राऊतांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. याला आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्वज्ञानी संजयजी मुंबईचा सातबारा नावावर केलात की काय ? मुंबईकरांचं अजून किती मनोरंजन करणार आहात..?, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहे.

मुंबईचा दादा असल्याचं तुम्हाला बोलून दाखवावं लागतंय. यात सगळं आलं. तसचं त्या पुढे म्हणाल्या, मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी आणि माज आत मुंबईकरच उतरवेल.

दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलंय. ‘ईडीच्या ऑफिसमध्ये कोण लोकं बेकायदेशीरपणे जाऊन बसतात? जी दोन-तीन लोकं जातात, ईडीला ब्रीफ करतात, ईडीला आदेश देतात, कोणाला टॉर्चर करतात, मी फडणवीसांना आव्हान करतोय… आणि त्यांना कळलं असणार मला काय सांगायचंय ते, असा सूचक इशाराच राऊत यांनी दिलाय.

संजय राऊत यांच्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत रोज सकाळी 9 वाजता येऊन मनोरंजन करत असतात. त्यांच्या म्हणण्याला अधिक गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असं फडणवीस म्हणालेत.

मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात, असा टोला देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

ती गोष्ट माझी पाठ सोडत नाहीये; पॅानस्टार मिया खलिफाचा धक्कादायक खुलासा 

“मुंबईचा दादा शिवसेना पण ती फक्त मातोश्रीपुरतीच” 

भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल- नरेंद्र मोदी

जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर रुग्णालयात दाखल! 

सुर्यकुमार यादवने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू!