मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सचिन वाझेचा खळबळजनक दावा

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दावा केला होता की अनिल देशमुख यांनी वाझेला बार आणि हुक्का पार्लरमधून महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं.

सिंह यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्यात.

एक पत्रच सचिन वाझेकडून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला (Enforcement Directorate) देण्यात आलं आहे. वाझे यासंदर्भात ईडीकडे 14 फेब्रुवारी रोजी आपलं म्हणणं मांडणार असल्याचंही कळतंय.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आलं. तर एका प्रतिज्ञापत्रात वाझेने सांगितलं की, त्याने अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसारच बारमधून खंडणीची वसुली केली.

अनिल देशमुख यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असंही सचिन वाझे याने पत्रात म्हटल्याचं कळतंय.

वाझेनं असंही सांगितलं की, देशमुख यांनी आपल्या आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात जबरदस्ती वसूलीच्या खोट्या केसेस दाखल केल्या.

महत्वाच्या बातम्या- 

“मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकरच उतरवतील” 

ती गोष्ट माझी पाठ सोडत नाहीये; पॅानस्टार मिया खलिफाचा धक्कादायक खुलासा 

“मुंबईचा दादा शिवसेना पण ती फक्त मातोश्रीपुरतीच” 

भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल- नरेंद्र मोदी

जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर रुग्णालयात दाखल!