विरोधकच तुकडे-तुकडे गँग आहे; अमित शहांची बोचरी टीका

नवी दिल्ली | दिल्लीतील बादली विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ही टीका केली. विरोधी पक्ष म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून तुकडे-तुकडे गँग आहे, अशी घणाघाती टीता अमित शहा यांनी केली आहे.

२ वर्षापूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. भारत तेरे ‘टुकडे टुकडे हजार’ असं म्हटलं गेलं. अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवं की नाही? या लोकांना तुरुंगात टाकलं तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून गोंधळ घालतात, अशी टीकाही शहांनी केली.

देशविरोधी शक्तींना नियंत्रणात आणण्याचं काम जर कोणी करू शकत असतील तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला आहे.

मोदींनी ५ ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम रद्द केलं. उद्या २६ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकेल. हे तुम्ही टीव्हीवर पाहा, असं आवाहन शहा यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक दोघांची भूमिका महत्वाची- रामनाथ कोविंद

-लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक दोघांची भूमिका महत्वाची- रामनाथ कोविंद

-“उद्धव आणि संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालंय”

-यांच्या देशभक्तीला सलाम.. हिमवीरांनी बर्फात फडकवला तिरंगा

-“जयंत पाटलांचा आंबेडकरांवरील आरोप म्हणजे निव्वळ बालिशपणा”