भिंत ओलांडून चिदंबरम यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान!

मुंबई  | माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करताना त्यांच्या घराची भिंत ओलांडून त्यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संधेला राष्ट्रपती पोलीस अधिकारी पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.

गेल्या वर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना अटक करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक रामास्वामी पार्थसारथी यांनी अटक केली होती. या अधिकाऱ्यासह 28 सीबीआय अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानं सम्नामित करण्यात आलं आहे.

सीबीआयचे सहसंचालक धीरज कुमार शुक्ला यांनाही विशिष्ट सेेवेसाठी सन्मानित करण्यात आलं आहे. शुक्ला यांनी मुंबईच्या पत्रकार जेडे मृत्यू प्रकरणाचा यशस्वीरीत्या तपास केला होता.

दरम्यान, रवी नारायण त्रिपाठी, मुकेश वर्मा, नितेश कुमार, बरुण कुमार सरकार, नारायण चंद्र साहू, नंद किशोर, नूर अली शेख आणि रोहिताश कुमार धिनवा यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विरोधकच तुकडे-तुकडे गँग आहे; अमित शहांची बोचरी टीका

-मी फाटका माणूस, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही- संजय राऊत

-लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक दोघांची भूमिका महत्वाची- रामनाथ कोविंद

-“उद्धव आणि संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालंय”

-यांच्या देशभक्तीला सलाम.. हिमवीरांनी बर्फात फडकवला तिरंगा