पंडित नेहरूंनी ‘ही’ हिमालयाहून मोठी चूक केली- अमित शहा

नवी दिल्ली |  काश्मिरचा इतिहास तोडून मोडून देशासमोर ठेवला गेला. कारण ज्या लोकांची चुकी होती त्यांनी इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना काश्मिरचा प्रश्न युएनमध्ये घेऊन जाण्याची खरंच काही गरज नव्हती. त्यांची ती हिमालयाहून मोठी चूक होती, अशी टीका भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

कलम 370 हटवण्यासाठी भाजप आणि बाकीचे पक्ष खूप वर्ष संघर्ष करत होते. भाजपने अनेक वर्ष यासाठी आंदोलने केली. आणि आज आम्ही ती मागणी पूर्ण करून दाखवली, असं शहा म्हणाले.

मतांसाठी आणि राजकारणासाठी आम्ही कलम 370 हटवलं, असं जे आम्हाला म्हणतात त्यांना मी सांगतो की पार्टी स्थापन झाल्यापासून आमचं उदिष्ट होतं की कलम 370 हटवायचं म्हणजे हटवायचं, असंही शहा यांनी स्पष्ट केलं.

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी ही काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबतीत असं घडलं नाही, की स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरवली जाईल, असंही शहा म्हणाले.

दरम्यान, एकूणच अमित शहा यांनी कलम 370 च्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार तोफ डागली.

महत्वाच्या बातम्या-