उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच शिवसेनेनं केलं एबी फॉर्मचं वाटप!

मुंबई |  शिवसेनेने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहिर करण्याआधीच एबी फॉर्मचं वाटप केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केलं. त्यामुळे शिवसेनेच्या या संभाव्य उमेदवारांची नावं माध्यमांसमोर आली आहेत.

ज्या मतदारसंघाबाबत युतीत अगदी स्पष्टता आहे आणि पक्षांतर्गतही ज्या जागांवर काहीही वाद नाही, अशा बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेनेने एबी फॉर्मचं वाटप केलं.

शिवसेना-भाजप युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळातही बरिच चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत रविवारी एबी फॉर्म देण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिल्याने शिवसेनेने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

कोल्हापूरमध्ये 8 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याची माहिती कळतीये. पिंपरी राखीव मतदारसंघातून आमदार गौतम चाबुकस्वार यांना, तर हिंगोलीतील कळमनुरीतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. मात्र शिवसेना आता एक पाऊल मागे आल्याची माहिती कळतीये.

महत्वाच्या बातम्या-