मुंबई | विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा आज लगोलग मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी कलम 370 मुद्द्यावरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आणि 370 ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा जागवून द्या, असं आवाहन केलं.
कलम 370 मुळे देशात दहशतवाद फोफावला… पाकिस्तानच्या हाती आयतं कोलीत मिळालं… सूफी संत आणि काश्मिर पंडितांना बाहेर हाकललं… 40 हजार जणांचे जीव गेले आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्याचा विरोध करतात. त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असं म्हणत कलम 370 मुद्द्यावरूनच विधानसभेचा प्रचार करायचा असं भाजपचं ठरलेलं आहे.
आमच्यासाठी कलम 370 हा राजकारणाचा मुद्दा नाही. तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. भारतमातेला आम्हाला अखंड ठेवायचंय, असं ते म्हणाले. आज अमित शहा आपल्या भाषणात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. युतीच्या मुद्द्यावर त्यांनी अवाक्षरही काढलं नाही.
संस्कृतीच्या रक्षणासाठी कलम 370 ची काय आवश्यकता आहे काय?? महाराष्ट्र, गुजरात, आसाम या राज्यांत आहे काय कलम 370?? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, अमित शहांच्या भाषणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मंदी या गोष्टी महत्वाच्या आहेत, यावर काहीतरी बोला. उगीचच दिशाभूल करू नका, असं मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर केलं ट्रोल – https://t.co/mmzw1MXnaG @sonakshisinha
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
‘मिडल फिंगर’ दाखवणं पडलं महागात; मिळाली ‘ही’ शिक्षा – https://t.co/HoNrf7z8A9 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
“माझे वडिल गेल्यानंतर मी काय ढोलताशे घेऊन मैदानात उतरायचं होतं का??” https://t.co/equtt6VU1U @Pankajamunde @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019