दिल्लीकरांनो काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत- अमित शहा

नवी दिल्ली | दिल्लीकरांनो काही समाजकंटक सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या प्रयत्न करत आहेत. कुठल्याही जाती भेदभावाशिवाय पोलीस नागरिकांना सुरक्षा प्रदान करत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.

हिंसाचारग्रस्त भागात उद्या सकाळी 10 वाजेनंतर काही आदेशात सूट दिली जाणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी दिल्ली पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. 22829334 आणि 22829335 या क्रमांकावर फोन करून हिंसा करणाऱ्यांची माहिती नागरिक देऊ शकतात, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

या बैठकीनंतर गृहमंत्रालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलंय. यात सुरक्षेसंबंधी उपाय योजनांसह नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 48 एफआयआर दाखल केल्या आहेत. हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी या एफआयआर दाखल झाल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकार मराठा तरूणांना न्याय देण्यास असमर्थय; चंद्रकांत पाटलांच सरकारवर टीकास्त्र

-विलासराव देशमुखांवर बायोपिक काढणं सोपं नाही- रितेश

-सगळं काम अजित पवारच करतायेत… मुख्यमंत्री काहीच करत नाहीत- नारायण राणे

-आम्ही कोणत्याही कामांना स्थगिती देत नाही, आम्ही विकासाचे मारेकरी नाही- मुख्यमंत्री

-दिल्लीत शांतता ठेवणं ही सरकारची जबाबदारी- RSS