ठाकरे सरकार मराठा तरूणांना न्याय देण्यास असमर्थय; चंद्रकांत पाटलांच सरकारवर टीकास्त्र

मुंबई | मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

2014 मध्ये मराठा आरक्षणाद्वारे ज्यांची नोकरभरती झाली मात्र ज्यांना नियुक्ती पत्र मिळालं नाही, असे मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी गेल्या महिन्याभरापासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. यावरून चंद्रकांत पाटलाचं सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा तरुणांना न्याय मिळावा यासाठी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. मात्र त्यावर मांडणी करण्याची परवानगी दिली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने तरूणांच्या आयुष्याचा विचार करून त्यांना योग्य नयाय द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-विलासराव देशमुखांवर बायोपिक काढणं सोपं नाही- रितेश

-सगळं काम अजित पवारच करतायेत… मुख्यमंत्री काहीच करत नाहीत- नारायण राणे

-आम्ही कोणत्याही कामांना स्थगिती देत नाही, आम्ही विकासाचे मारेकरी नाही- मुख्यमंत्री

-दिल्लीत शांतता ठेवणं ही सरकारची जबाबदारी- RSS

-केंद्र सरकारला खडेबोल सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली आम्ही केली नाही तर…- भाजप