मला राजसाहेबांनी ‘ती’ गोष्ट सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सटकली- अमित ठाकरे

मुंबई |  मनसेने अमित राज ठाकरे यांच्यावर पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. मनसे नेते बाळा बांदगावकर यांनी यासंबंधीचा ठराव मांडला तर मनसेच्या नेत्यांनी त्यांच्या ठरावाला अनुमोदन दिलं. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित यांनी छोटेखानी भाषण केलं. यावेळी माझ्यावर राजसाहेब ही जबाबदारी देतील याची मला कल्पना नव्हती. काल संध्याकाळी 7 वाजता ही गोष्ट मला कळाली. आता भाषण करायचंय या कल्पनेने माझ्या पायाखालची जमीनच सटकली, असं अमित ठाकरे म्हणाले.

राजसाहेबांचा मुलगा म्हणून लोकांच्या माझ्याकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांच्या या सगळ्या अपेक्षा मला आता पूर्ण करायच्या आहेत. दडपण निश्चित आहे पण पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो, असं ते म्हणाले.

भविष्यात भाषण करेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आता पक्षाच्या नेतेपदी निवड झालीये. लोकांचे प्रश्न मांडायचेत. लोकांच्या अन्यायाला वाचा फोडायचीये त्यासाठी आता बोलावं लागेल, असंही ते म्हणाले.

पद नव्हतं तरी काम करत होतो… आता पद आलंय तर आणखी जोरात काम करेल. ग्राऊंड लेव्हल पासून काम करण्याला माझं प्राधान्य असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 

महत्त्वाच्या बातम्या-