“आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा; संधी दिल्याबद्दल राजसाहेबांचे धन्यवाद”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत घोषणा केली आहे. मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग करण्यात आलं.

आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. मला ही संधी दिल्याबद्दल राजसाहेबांचे धन्यवाद. मी आज ठराव मांडणार हे  मला काल संध्याकाळी सांगितलं गेल त्यामुळे पायाखालची जमीन सरकण काय असतं ते मला कळलं, असं अमित ठाकरे म्हणाले.

येत्या दोन महिन्यांमध्ये पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. गेल्या 14 वर्षांमध्ये मनसेचं पहिलं अधिवेशन झालं आहे. 27 वर्षात पहिल्यांदाच मी व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा आणि महत्वाचा दिवस आहे.

दरम्यान, मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांना व्यासपीठावर तलवार देऊन स्वागत केलं.

महत्वाच्या बातम्या-