खबरदार जर ईव्हीएममध्ये घोटाळा कराल तर…; पळता भूई थोडी करू- डॉ. अमोल कोल्हे

जामखेड |  कर्जत जामखेडच्या लोकांनी आमचं आज अतिशय उत्साहात स्वागत केलं. राज्यात फिरतो आहे… राज्यात देखील अभूतपूर्व स्वागत होत आहे. परंतू असं असताना देखील आणि लोकांचं प्रेम मिळत असताना देखील काही अघटीत घडलं आणि यांनी जर ईव्हीएममध्ये घोटाळा केला तर यांची पळता भूई थोडी करू, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज कर्जत जामखेडमध्ये पोहचली आहे. या मतदारसंघातून पवारांचे नातू रोहित पवार विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठीच आजची सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीने मोठं शक्तीप्रदर्शन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचा तर आग्रह आहेच की मतदान बॅलेट पेपरवर झालं पाहिजे पण जर नाहीच झालं तर ईव्हीएम तर ईव्हीएम… आपण आपला लढा यशस्वी करून दाखवू, असं म्हणत कोल्हेंनी कार्यकर्त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली उडवली होती. त्यांचाही अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेत मुख्यमंत्री महोदय ‘उघडा डोळे आणि बघा नीट’, असा टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या-