महेश लांडगे देणार भोसरीत भाजपकडून उमेदवारीसाठी मुलाखत

पुणे :  पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी शहर सर्वात लहान राखीव मतदारसंघातून भाजपकडून सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत. शहरातील इतर 2 मतदारसंघात 15 इच्छुकांच्या मुलाखती आज होणार आहेत. यात भोसरीचे अपक्ष आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे हे भोसरीतील उमेदवारीसाठी भाजपकडून मुलाखत देणार आहेत.

पिंपरी-चिंचवड मतदारसंघातीत पिंपरी शहराची जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आली आहेे. आणि पिंपरीमध्ये  शिवसेनेचाच आमदार आहे. तरीही भाजप पिंपरी मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे.

युती होणार असल्याची शक्यता भाजप व शिवसेनेकडून वर्तवण्यात आली आहे. तरीही दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी सुरु असल्याचं दिसत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या वाट्याच्या पिंपरी मतदारसंघातील इच्छुकांच्याही मुलाखती भाजप घेत आहे. त्यात 15 इच्छुकांसह 2 विद्यमान आमदार आणि 6 नगरसेवकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-