या देशात कुणीही राजे नाही- अमोल कोल्हे

नवी मुंबई |  भारतात कुणीही राजे नाही. स्वातंत्र्यानंतर सर्व सामाज्र खालसा झालेली आहेत, अशा शब्दात शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतेच भाजपवासी झालेले उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

पक्ष सोडून जाणारे सांगत आहेत की जनतेच्या विकासासाठी जात आहे. मात्र जनता एवढी दुधखुळी राहिलेली नाही. त्यांना आता चांगलं समजतं. जे पक्ष सोडून गेले ते स्वता:ची कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत, असा घणाघात अमोल कोल्हेंनी केला.

काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेंनी साताऱ्यात उदयनराजेंची भेट घेतली होती. यानंतर मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंनी भाजपत प्रवेश करताच मात्र कोल्हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आतापर्यंत शिवस्वराज्य यात्रा जवळपास 60 ते 62 मतदारसंघातून गेली. या मतदारसंघात फक्त एक जाणवतं की 50 वर्ष शरद पवार नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणावर गारूड घातलं. शरद पवार नावाचा माणूस राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. ती आता व्यक्ती राहिली नसून विचार झाला आहे. त्यामुळे कुणी कुठेही गेले तरी फरक पडत नाही, असं कोल्हे  म्हणाले.

दरम्यान, याच सभेत बोलताना शरद पवार यांनी देखील उदयनराजेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ज्यांना जनतेने निवडून दिलं ते पळपुटे निघाले. पण यांना यांची जागा आता जनताच दाखवून देईल, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-